CM Uddhav Thackeray on Potholes : कामचुकारपणा केल्यास कंत्राटदाराची गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री
राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई केली जाईल या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले.