अनिल परबांना कोरोनाची लक्षणे, लिलावती रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यानी बोलावलेली आमदारांची बैठक रद्द
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल परब यांना कोरोनाची लक्षणं असल्याने त्यांना उपचारांसाठी लिलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. दरम्यान यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली मुंबईतल्या आमदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे. वर्षा बंगल्यावर आज मुंबईतील आमदारांची बैठक पार पडणार होती. परंतु अनिल परब आणि काही आमदारांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांन आजची बैठक रद्द केली.