CM Uddhav Thackeray Discharged : शस्त्रक्रियेनंतर 22 दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज
CM Uddhav Thackeray Discharged : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. आज 22 दिवसांनी ते घरी परतले आहेत. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिला त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) HN रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधी वरिष्ठ आर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्यानं विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.