CM Eknath Shinde गटाची दसरा मेळाव्यासाठी तयारी, 2200 VIP नेते ,पदाधिकारी पासेस : ABP Majha
शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक पक्ष, दोन गट, दोन मैदानं आणि दोन नेते असं चित्रं पाहायला मिळतंय..... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत एक पक्ष, एक नेता, एक मैदान असा लौकीक मोठ्या अभिमानानं मिरवणाऱ्या शिवसेनेसमोर शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतर मोठं आव्हान निर्माण झालंय. बीकेसीवर प्रतिमेळावा आयोजित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरेंना आव्हान दिलंय..... तर कोर्टाच्या निर्णयामुळे ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानात केलेली जय्यत तयारी, शक्तीप्रदर्शनासाठी राज्यभरातून हजारो वाहनांमधून दाखल होत असलेले दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आणि मेळाव्याआधी रंगलेलं टीझर वॉर..... या पार्श्वभूमीवर कुणाचा मेळावा सरस ठरणार आणि कोण कुणावर भारी पडणार याची चर्चा राज्यभरात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भात्यात राखून ठेवलेले कोणते बाण सोडणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.