CM Eknath Shinde : कोस्टल रोडला सी लिंक जोडण्याचं काम दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होणार
CM Eknath Shinde : कोस्टल रोडला सी लिंक जोडण्याचं काम दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होणार वरळी (Worli Accident) हिट अँड रन (Hit & Run Case) प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे (Mihir Shah) वडील, राजेश शाह (Rajesh Shah) यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी हिट अँड रन अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटात राजेश शाह शिवसेना उपनेते पदावर होते. त्यांचा मुलगा मिहीर शाह यानं भरधाव गाडीनं वरळीत एका महिलेला चिरडल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. "होय, अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो"; आरोपी मिहीरचा कबुलीजबाब वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाहच्या कुटुंबियांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. मिहीरला अटक झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हे शाखा 3 मध्ये आई, दोन बहिणी आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आला. अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली मिहीर शाहनं यावेळी दिली. मिहीरच्या अटकेनंतर प्राथमिक तपासात गाडी चालवत असल्याची कबुली त्यानं दिली आहे. यात मिहीरच्या बहिणीनं या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भितीनं आम्ही घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. मिहीर आणि त्याचं कुटुंब दोन गाड्यांनी शहापूरला गेलं. शहापूरला एका पंजाबी व्यक्तीनं त्यांची शहापूरला राहण्याची व्यवस्था केली. या पंजाबी व्यक्तीचे शाह कुटुंबियाशी जुनं आणि घरचे संबध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हिट अँड रन प्रकरण म्हटलं की, मद्यप्राशन आणि बड्या बाबांची पोरं. हे समीकरणच बनून गेलंय की काय? असा प्रश्न आता पडू लागलाय. कारण पुणे पोर्शे अपघात प्रकरण असो की, वरळीतील बीएमडब्ल्यू कारचं प्रकरण असो. दोन्हीकडे समान धागा दिसतोय, तो म्हणजे, बड्या बापांची बेजबाबदार धेंड.