CM Ekanth Shinde at Worli : ठाकरेंच्या वरळीत कोळी बांधवांकडून होणार मुख्यमंत्र्यांचा सत्कार

Continues below advertisement

वरळी कोळीवाड्यातल्या कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. वरळी कोळीवाडा येथील क्लीव्हलँड बंदर भागात मच्छीमार बांधवांच्या बोटींच्या वाहतुकीसाठी १२० मीटरचा कायमस्वरूपी नेव्हिगेशन स्पॅन मिळवून दिल्याबद्दल या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी ६ वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सभाही आयोजित करण्यात आलीय. त्यानिमित्तानं शिंदे गट आणि भाजपकडून वरळीत मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन दिवसांआधी आदित्य ठाकरे यांनी आपण राजीनामा देतो, एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवावं असं आव्हान दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram