CM DCM Bungalow Expenses : वर्षा, सागर बंगल्यावरील खानपानासाठी वार्षिक 5 कोटी रुपयांचा खर्च मर्यादित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरील टीकेनंतर आता पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एवढेच नाही, तर वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. तसेच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला ५ कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola