Sharad Pawar Saamna Interview | भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. उलट भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी घेतलेल्या मुलाखत शरद पवार बोलत होते. 'एकच शरद' या मुलाखतीचा आज तिसरा आणि अखेरचा भाग प्रसारित झाला. पंतप्रधानांकडे माझ्याबद्दल किंवा पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी मी दिल्लीत जाऊन पतंप्रधानांची भेट घेतली. त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, जमलं तर शिवसेनेसोबत जाऊ किंवा विरोधी पक्षात बसू. हे सांगायला जाताना एक गृहस्थ माझ्याशेजारी होते त्यांचं नाव संजय राऊत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola