CIDCOच्या वर्धापनादिवशी प्रकल्पग्रस्तांकडून सिडको हटाव आंदोलन

सिडकोच्या स्थापनादिनाच्या निमित्तानं नवी मुंबई,पनवेल आणि उरणमध्ये सिडको हटाव भूमिपुत्र बचाव आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबईतल्या प्रत्येक गावाच्या वेशीवर प्रकल्पग्रस्तांनी हातात फलक घेऊन सिडकोविरोधात घोषणा दिल्या आणि आपला निषेध नोंदवला. नवी मुंबईमधली 95 गावं आणि नैना प्रकल्पबाधित 272 गावांसह एसईझेड आणि विमानतळ प्रकल्पबाधित गावांनीही सिडको हटावचा नारा दिला आहे. गेली पाच दशकं सिडको या शहराचं नियोजन करत असली तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळं सिडकोनं आता नवी मुंबई महापालिकेला सर्व हस्तांतरित करून येथून निघून जावं अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola