Churchgate Railway Station : चर्चगेट स्थानकाच्या इमारतीचं सात कोटी खर्चून संवर्धन

Continues below advertisement

Churchgate Railway Station : चर्चगेट स्थानकाच्या इमारतीचं सात कोटी खर्चून संवर्धन  पश्चिम रेल्वेचे चर्चगेट येथील मुख्यालय 125 वर्षांचे होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात या ऐतिहासिक वास्तूला 125 वर्ष पूर्ण होतील. 1899 साली बांधून पूर्ण झालेली ही वास्तू मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाची टप्पा आहे. आधी बी बी अँड सी आय ही ब्रिटिश कंपनी भारताच्या पश्चिम किनाऱ्याला दिल्ली पर्यंत जोडण्यासाठी रेल्वे वाहतूक चालवायची. तेव्हाच्या विक्टोरिया टर्मिनस आणि आताच्या सीएसएमटी स्टेशन प्रमाणे या रेल्वे वाहतूक करणाऱ्या कंपनीला देखील एका मोठ्या मुख्यालयाची गरज होती. त्यामुळे एफ डब्ल्यू स्टीवन्स यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. त्यांनी 1894 मध्ये चर्चगेट स्टेशन समोरील मोकळ्या जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले. हे बांधकाम स्थानिक मराठी इंजिनियर्स ने पार पाडले. 1899 साली हे काम पूर्ण झाले. स्वातंत्र्यानंतर बी बी एन सी आय या कंपनीचे पश्चिम रेल्वेत रूपांतर करण्यात आले. मात्र मुख्यालय तेच राहिले. आता पश्चिम रेल्वे सात कोटी रुपये खर्च करून या इमारतीला आधी प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या इमारतीत कशाप्रकारे संवर्धनाचे काम सुरू आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram