Christmas 2019 | मुंबई, वसई, गोव्य़ासह देशभरात ख्रिसमसचा उत्साह शिगेला, बाजारपेठा फुलल्या | ABP Majha

ख्रिसमसचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून भारतातही हा उत्साह शिगेला पोहोचलाय. ख्रिसमससाठी मुंबई, वसई, गोव्य़ासह देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. विविध शहरातल्या बाजारपेठा ख्रिसमसनिमित्त फुलून गेल्यात. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी आकाशकंदिल यासह विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलल्यात. चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे साकारण्यात आलेत. पणजीच्या मळा चर्चसमोर तब्बल तीस फुटांची ख्रिसमस बेल उभारण्यात येतेय. तिकडे वसईमध्येही कॅरल सिंगिंगचे सूर निनादत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola