Chitra Wagh on Shivsena : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्राताईंनी फोटोच दाखवले!
BJP Chitra Wagh On Shiv Sena UBT Election Advt : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जाहीर सभांमधून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना आता जाहिरातीवरूनही रणकंदन होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) एका जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.