Chintamani Ganpati : चिंतामनीचं यंदा जोरदार स्वागत; याक्षिणी देवीचा दरबार ठरतोय आकर्षक
एबीपी माझाच्या प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याचं घरात गणपती बाप्पा विराजमान झाले असतील. आज दिवसभर गणरायाच्या आगमनाची लगबग होती. संध्याकाळ होईपर्यंत सगळे गणपती घरी पोहोचले आणि आतापर्यंत त्यांची प्रतिष्ठापनाही झाली असेलच. मुंबईतही गणेश मंडळाची लगबग होतीच. अशाच एका मंडळात आपण आता जाणार आहोत, ते मंडळ आहे मुंबईतील चिंचपोकळीमध्ये. तिथल्या सर्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी.. त्याचा आगमन सोहळा जितका भव्य दिव्य होता, तितकीत भव्यता त्याच्या मंडपात आहे.