CM Relief Fund | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला टाळं, रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत | ABP Majha

सर्वच राजकीय पक्षांनी जनतेनं दिलेला कौल बाजूला ठेवल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ ओढवलीय. मात्र नेत्यांच्या या राजकारणात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला आज तर चक्क टाळे लागलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गरजू लोकांना आजही मदतीशिवाय परतावं लागत आहे. गुरुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या दरवाजावर आणि बाजूला असलेले नियम आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे बोर्ड लावले होते. पण आज तेही काढून टाकण्यात आले आहेत. ज्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून राज्यातील हजारो रुग्णांना आजवर मोठी मदत झाली. त्या कक्षाचं हे दार आज बंद करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola