Corona Awareness | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मित्र सरसावले, कोरोनासंदर्भात आकर्षक डिस्प्ले बनवून जनजागृती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जे जे महाविदयालयातील मित्रांनी देखील पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतःहून काही आकर्षक डिसप्ले बनवून या कोरोना जनजागृती मोहिमेत आपला सहभाग नोंदवला आहे. सध्या ही मोहीम सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ही मोहीम संप्रेषण तज्ज्ञ भूपाल रामनाथकर यांनी सुरू केली आहे. या मोहिमेत आता संपुर्ण महाराष्ट्रातील डिझाईनर सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिझाईनर्सने देखील आपला सहभाग नोंदवला आहे.