Chhatrapati Shivaji Maharaj Park Art Festival : आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून फेस्टिव्हलचं आयोजन
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं स्थान मोलाचं आहे. त्याच शिवाजी पार्कचा कलेच्या माध्यमातून गौरव करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. वेध या सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित चारदिवसीय आर्ट फेस्टिव्हलला उद्यापासून सुरुवात होत आहे. या कला महोत्सवात शिवरायांचं आठवावं रूप या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती मुंबईकरांना पाहता येणार आहेत. शिवरायांच्या समकालीन दुर्मिळ चित्रांचं उद्घाटन उद्या सायंकाळी ६.३० वाजता आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात येईल.
Continues below advertisement
Tags :
Chhatrapati Shivaji Maharaj Dadar Movement Political Social Park Concept 'Maharashtra MLA Aditya Thackeray Cultural Sthan Molach Gaurav