Chembur College Ban Burqa : Acharya College आणि DK Marathe College मध्ये बुरखा घालून येण्यावर बंदी

Continues below advertisement

Chembur College Ban Burqa : Acharya College आणि DK Marathe College मध्ये बुरखा घालून येण्यावर बंदी

चेंबूरच्या एनजी आचार्य आणि डिके मराठे कॉलेज मध्ये गणवेश वर बुरखा घालून कोलेज मध्ये येण्यास बंदी केल्याने मुस्लिम विद्यार्थी आक्रमक झाले होते.पोलीस प्रशासनाच्या मदतीने आता विद्यार्थ्यांना आठ दिवसांची मुदत दिली असून कॉलेज आपल्या निर्णयावर ठाम आहे.गणवेश घालून आम्ही येऊ पण त्यावर बुरखा घालणार आणि कॉलेज च्या आतमध्ये बुरखा काढण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी तिथे बुरखा काढून विद्यार्थिनी येतील अशी मागणी मुस्लिम विद्यार्थ्यांची आहे. तर कॉलेज मध्ये प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांनी गणेवेशातच आत यावे बुरख्यात नाही ही कॉलेज ची भूमिका आहे.या विरोधात आज कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करुन कॉलेज कडून विद्यार्थ्यांना कॉलेज मधून एडमिशन रद्द करण्यास आणि तोडगा काढण्यास आठ दिवसांचा अवधी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram