Chandrakant Patil | महाविकासआघाडी सरकार अंतर्विरोधामुळे पडणार : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकासआघाडी सरकार अंतर्विरोधामुळे पडणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Continues below advertisement