BMC Ward Reorganization : वॉर्ड पुनर्रचनेविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज निर्णयाची शक्यता

ठाकरे गटाला मिळणार का दिलासा ? मविआ सरकारनं बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या ती 227 वरुन 236 पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गटानं बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत 227 केली. या निर्णयामुळे बृहन्मुंबई महापालिकेची आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे. तसेच याचा सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसणार आहे,  असा दावा करत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज हायकोर्ट  निर्णय देण्याची शक्यता आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola