Central Railway Mega Block: मध्यरात्री दोन वाजता मोगाब्लॉक संपणार ABP Majha
मध्य रेल्वेवर सुरु असलेला ३६ तासांचा मेगाब्लॉक मध्यरात्री २ वाजता संपणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून हा जम्बो मेगाब्लॉक सुरु झाला आहे. या काळात ठाणे स्टेशन जवळ जुन्या धीम्या मार्गिका नवीन बांधलेल्या मार्गीकांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले. या ब्लॉकदम्यान नवीन मार्गीकेवरून डिझेल इंजिन चालवून परीक्षण देखील करण्यात आलंय. पाचव्या-सहाव्या मार्गिकचं काम वेगात पूर्ण व्हावं यासाठी येत्या काळात ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.