Diva-Thane : ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू ABP Majha
मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या मार्गिंकांसाठी गेले काही आठवडे मेगाब्लॉक घेण्यात आला, त्या ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू होत आहेत. त्याचा फायदा जलद लोकल, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना होणार आहे. या मार्गिकांअभावी आधी मध्य रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत होत होतं. आता हा प्रवास विनाअडथळा होणार असल्यानं प्रवाशांना होणारा मनस्ताप टळणार आहे.