AC local | मध्य रेल्वेची 29 जानेवारीपासून एसी लोकल धावणार | ABP Majha
मध्य रेल्वेवर एसी लोकल धावण्याला अखेर मुहूर्त मिळालाय. २९ जानेवारीला ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर पहिल्यांदा एसी लोकल धावणार आहे. रेल्वेतल्या सूत्रांनी तशी माहिती दिली आगे. मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानं २४ जानेवारी आधी एसी लोकल चालवण्याचं नियोजन होते. परंतु त्यादिवशी मुंबईत मोर्चाचं आयोजन असल्यानं ही लोकल आता २९ जानेवारीला रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते चालवण्याचं नियोजन असल्य़ाचं सूत्रांनी स्पष्ट केलंय,