आठवड्यात दोनदा भेटलो, असंच भेटत राहिलो तर विकास निश्चित, रावसाहेब दानवे-सुभाष देसाई एकाच मंचावर
राज्यातील निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबईतील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे मंगळवार पासून राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सव' परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित होते.