Kanjurmarg | कांजूरमार्ग मेट्रो 3 कारशेडच्या जागेवर दावा सांगत केंद्र सरकारची उच्च न्यायालयात याचिका

Continues below advertisement
कांजूरमार्ग इथल्या मेट्रो 3 कारशेडच्या जागेवर दावा सांगत केंद्र सरकारच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नोव्हेंबर 2018 मध्ये राज्याच्या महसुल खात्यानं जारी केलेला निर्देशांना मिठागर उपायुक्तांकडनं आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर आठवड्याभरात राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणी 4 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. शुक्रवारी यावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram