Bhiwandi : भिवंडीत खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान? भाजप आमदार योगेश सागर यांचा आरोप

Continues below advertisement

Bhiwandi : भिवंडीत खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान? भाजप आमदार योगेश सागर यांचा आरोप

भिवंडीच्या कणेरी परिसरातल्या एका खाजगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. मौजे कणेरीतली सर्व्हे नंबर २६ ही जागा गोपाळ गणेश दांडेकर ट्रस्टची खाजगी मालमत्ता आहे. त्या जागेची खोटी कागदपत्रं सादर करुन, तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप योगेश सागर यांनी केला. या प्रकाराची चौकशी करुन, तातडीनं काम थांबवावं अशी मागणीही त्यांनी केली. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी त्याला हरकत घेऊन, सदर जागा मुंबई महापालिकेनं उपलब्ध करुन दिल्याचं म्हटलं. या प्रकरणात दांडेकर ट्रस्टनं संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. ही जागा आपल्या मालकीची असून शासकीय विभागांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तालिका अध्यक्षांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram