CCTV | धक्कादायक! धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढून महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न | ABP Majha

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी.. वेग कमी झाल्याची संधी साधत, एक चोर  एक्स्प्रेसमध्ये चढला आणि त्यानं महिलेच्या हातातली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.. चोरानं दिलेल्या हिसक्यामुळं ती महिला एक्स्प्रेसमधून खाली पडतापडता वाचली आहे... बॅग हिसकवण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यानं पळ काढला... सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हीडिओ इंद्रायणी एक्स्प्रेसमधला असल्याचं व्हायरल झालं होतं.. मात्र रेल्वे पोलिसांनी हा व्हीडिओ इंद्रायणी एक्स्प्रेसमधला नसल्याचं स्पष्ट केलंय.  हा प्रकार तेजस एक्स्प्रेसमधला असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola