
CBI Probe in SSR Case | सीबीआयची टीम मुंबईत येणार, त्यांनाही क्वॉरन्टाईन करणार का?: भाजपचा सवाल
Continues below advertisement
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयची टीम दिल्लीतून कुठल्याही क्षणी मुंबईत दाखल होऊ शकते. या प्रकरणात सीबीआयनं आधीच स्थापन केलेली स्पेशल इन्विस्टिगेशन टीम या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. यात सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर मनोज शशीधर, आयपीएस गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अॅडशिनल एसपी अनिल यादव यांचा समावेश आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावरुन बीएमसी आणि पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहून चिमटा काढला आहे. आता सीबीआयची जी टीम मुंबईत तपासासाठी येऊ शकते, त्यांनाही क्वारंन्टाईन करणार का हा प्रश्न त्यांनी पत्रात विचारला आहे.
Continues below advertisement