CBI records Anup Dange statement : पोलीस अधिकारी अनूप डांगे यांचा जबाब सीबीआयकडून नोंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 May 2022 11:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयनं पोलीस अधिकारी अनूप डांगे यांचा जबाब नोंदवला यापूर्वी सीआयडी आणि एसीबीकडूनही डांगेंचा जबाब नोंद करण्यात आलाय. अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याप्रकरणी हा जबाबद नोंदवण्यात आलाय. त्याचप्रमाणे सीबीआयनं बुकी केतन तन्ना याचाही तीन दिवस जबाब नोंद केला. तन्नाच्या तक्रारीवरून ठाण्यात परबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केतन तन्नानं याप्रकरणातील काही फोन रेकॉर्डिंग सीबीआयला सोपवले आहेत. त्या आधारे तपास सुरू आहे.