Anil Deshmukh यांची दिवाळी घरी की तुरुंगातच? जामीन अर्जावर आज सुनावणी

Continues below advertisement

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना जामीन मंजूर झालाय. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंंतर देशमुख यांनी आता सीबीआयच्या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सीबीआयने देशमुख यांच्या जामिनाला विरोध केलाय. तर सरकारी पक्षाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप देशमुख यांच्या वकिलांनी केलाय. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.  देशमुख यांची दिवाळी जेलमध्येच जाणार की घरी होणार याचा निर्णय सीबीआयच्या न्यायालयात होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram