पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आत्महत्या, जमिनीखाली असलेली विहीर शोधून मारली गाडीने उडी!

Continues below advertisement

मुंबई :  मुंबईमधील घाटकोपरच्या (Mumbai Ghatkopar Car)  राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये पडलेली कार अखेर 12 तासानंतर बाहेर काढण्यात आली आहे. या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही गाडी बाहेर काढण्यास अखेर यश आले आहे. सकाळपासून या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आणि स्थानिकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारमध्ये एक दोन ते तीन फुटाचा मासा देखील आढळून आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram