CAA Protest | सलग चौथ्या दिवशी मुस्लीम महिलांचा ठिय्या | ABP Majha
दिल्लीतील शाहीनबाग प्रमाणेच मुंबईतील नागपाड्यात महिलांचं ठिय्या आंदोलन सलग चौथ्या दिवशी सुरु आहे. अनेक महिलांनी घरातली नेहमीची कामं, मुलांचं रूटीन सांभाळून या मोर्चात सहभाग घेतलाय. पोलिसांनी महिलांना समजावून हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, महिला अजूनही आंदोलन सुरु ठेवण्यावर ठाम आहेत. नागपाड्यात सुरु असलेल्या मुस्लिम महिलांच्या आंदोलनात अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं जाऊन आंदोलकांची भेट घेतली..