Bomb Blast Threat : मुंबई लोकलवर बॉम्ब हल्ला करण्यात येणार असल्याचा निनावी फोन दुबईतून
मुंबई : मुंबईच्या लोकलवर बॉम्ब हल्ला करण्यात येणार असल्याचा निनावी फोनने खळबळ उडाली आहे. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन सुरु असून सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही. मुंबई लोकलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.