Grand Hayat Concert : ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर, कलाकारांची सुद्धा हजेरी
मुंबईतल्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत, कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई थिरकली होती.. आणि कोरोनाला गर्दीमध्ये चिरडणाऱ्यांमध्ये बॉलिवूडची स्टार मंडळी आघाडीवर होती... वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, अभिनेत्री जान्हवी कपूर, तसंच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हे स्टार्स हजर होते. त्यांना कॅमेऱ्यानं कैद केलंय... या कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता... सोशल डिस्टन्सिंगची देखील ऐशीतैशी करण्यात आली.. खरं तर सेलिब्रिटींना तरुणाई फॉलो करते.. सेलिब्रिटींनी कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावावी हा त्यांचा खासगी प्रश्न आहे.. मात्र कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं ही स्टारमंडळी टीकेचे धनी ठरताहेत.. दरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.