BMC | कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरोधात मुंबई पालिकेकडून गुन्हा दाखल
मुंबईच्या नानावटी रुग्णालया विरोधात महानगरपालिकेने सांताक्रूझ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंदवला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमावलीला धुडकावून कोविड 19 (covid-19) रुग्णांवर उपचार करण्याकरिता जादा बिल घेतल्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नानावटी विश्वस्त मंडळावर गुन्हा नोंदवण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.