BMC on Home Quarantine : होम क्वारंटाईनचा नियम मोडला तर मुंबई महापालिका तातडीनं कारवाई करणार!

मुंबईत तब्बल साडेसहा लाखांवर लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि कुणी होम क्वारंटाईनचा नियम मोडला तर महापालिका तातडीनं कारवाई करणार आहे. नियम मोडल्यास हातावर स्टँप मारला जाणार आहे आणि कुणाची तक्रार आलीच तर बाधित किंवा त्याच्या संपर्कातील व्यक्तीची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये केली जाणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिलीय. क्वारंटाईनचे नियम पाळले जातायत की नाही हे पाहण्याची जबाबदारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola