BMC : उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेकडून तब्बल सव्वाचार कोटी रुपये खर्च ABP Majha

BMC : उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेकडून तब्बल सव्वाचार कोटी रुपये खर्च ABP Majha

मुंबई महापालिकेनं शहरातील उंदीर मारण्यासाठी गेल्या चार महिन्यांमध्ये किती रुपयांचा खर्च केला, या प्रश्नावर तुमचं उत्तर काय असेल. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी हे उत्तर नक्की चुकेल. कारण त्या रकमेचा तुम्ही अंदाजच करू शकणार नाही. मुंबई महापालिकेकडून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये निव्वळ उंदीर मारण्यासाठी चार कोटी २६ लाख एक हजार २१० रुपये खर्च करण्यात आलेत. या चार महिन्यांच्या कालावधीत मुंबईत एक लाख ८५ हजार २७० उंदीर मारल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं आज सभागृहात देण्यात आली. त्यापैकी एक लाख ५८ हजार ९०९ उंदीर कंत्राटदारांनी मारले तर अन्य उंदीर महापालिका कर्मचाऱ्यांनी मारल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. रात्रपाळी मूषक संहरण पद्धतीनं एक उंदीर मारण्यासाठी कंत्राटदारांना प्रत्येकी २३ रुपये देण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola