BMC Delimitation : मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता, 227 वरुन 236 होणार असल्याचा अंदाज
Continues below advertisement
मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 227 वरुन 236 होणार असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित केली जाते. महापालिकांची सध्याची नगरसेवकांची संख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निश्चित करण्यात आलीय. कोरोनामुळे 2021च्या जनगणनेचे निष्कर्ष अजून जाहीर झालेले नाहीत. नगरसेवक संख्या वाढवताना राजकीय फायद्याचे गणितही डोळ्यासमोर ठेवलं जातं. त्यामुळे मुंबईतील नगरसेवक संख्या वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा होतेय याकडं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement