BMC Election : भाजपच्या आरोपांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही : शिवसेना

Continues below advertisement

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.

जुनी प्रभाग रचना बदलण्याचा शिवसेनाचा डाव फसल्याच्या दावाही आशिष शेलार यांनी केला. ते म्हणाले की, "जे प्रभाग आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही, अशा प्रभागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहेत." नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आशिष शेलार म्हणाले की, "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच 2021 च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु आहे

भाजपचे आरोप शिवसेनेने फेटाळले
दुसरीकडे आशिष शेलार यांचे आरोप शिवसेनेने फेटाळले आहेत. "शेलार यांच्या आरोपात काही तथ्य नाही. कारण गेल्या निवडणुकीत स्वत:च्या कार्यकाळात विभाग फोडून आकडे मिळवले, ते आता निसटून जात असल्याचं दिसल्यानंतर बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुळात शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. त्यांना वाटत असेल तर उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी दिली. 

"तर हा आरोप करताना ते स्वत: भयभीत आहेत. निवडणूक वेळेत होणार आहे. निवडणूक आयोगाला तारखा बदलण्याचा अधिकार नाही. बदलायचा असेल तर तो मुद्दा सरकारकडून सदनात येऊ शकतो. भाजपकडून बाष्कळ बडबड सुरु आहे. ती गांभीर्याने घेण्याची गरज नाही,"असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram