मुंबईत बाप्पांची उंची, कार्यकर्त्यांची संख्या किती असावी?, गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर
सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.