Iqbal Chahal : लस न घेणाऱ्यांना Omicron चा सर्वाधिक धोका, Vaccine घेण्यास टाळाटाळ करू नका
Continues below advertisement
Iqbal Chahal : एकीकडे ओमायक्रॉनमुळे राज्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय आणि त्यातच मुंबईत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. ती म्हणजे ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना ओमायक्रॉनच्या लाटेत सर्वाधिक धोका आहे. मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेले सर्व रुग्ण असे आहेत, ज्यांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही. मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेले 96 टक्के रुग्ण एकही डोस न घेतलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केली त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे. या संकटातून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं आहे.
Continues below advertisement