Mumbai Vaccination Drive: मुंबईत लसीकरणासाठी मनपा आयुक्तांकडून नवी नियमावली जारी;काय आहेत नवीन नियम?
मुंबईत लसीकरणासाठी मनपा आयुक्तांकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार सोमवार ते बुधवार ज्येष्ठ आणि दिव्यांगांना विनानोंदणी डोस घेता येणार आहे. तर उर्वारित 3 दिवस 100 टक्के नोंदणीधारकांचं लसीकरण होणार आहे. मुंबई महापालिका आयक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये किमान एक लसीकरण केंद्र उभारा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.