BMC CAG Report : मुंबई पालिकेबाबत कॅगच्या अहवालाबाबत कारवाईच्या विलंबाची शक्यता
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगच्या अहवालावरून सध्या भाजपच्या नेत्यांची ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू आहे... पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होतेय मात्र आता ही सगळीच प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत... अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई महानगरपालिका कारभाराच्या संदर्भात कॅगचा रिपोर्ट सादर करण्यात आला...मात्र अद्याप विधीमंडळ लोकलेखा समिती गठीत नसल्यानं या अहवालावर कारवाई होण्यास उशीर लागणार असल्याचं दिसतंय.. कॅगचा अहवाल आल्यानंतर लोकलेखा समिती संबंधित नगर विकास विभागाकडून याची माहिती मागवते. मात्र लोकलेखा समिती अस्तित्वात नसल्याने ही प्रक्रिया आता थंडावण्याची लक्षणं दिसतायत..
Continues below advertisement
Tags :
Demand Mumbai Municipal Corporation Inquiry Report Budget Session Strong Criticism BJP Governance CAG CAG Report Process Delay Mumbai Municipal Corporation Governance