BMC Budget 2023 : मुंबईकरांना कोणतं गिफ्ट मिळणार? मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार
Continues below advertisement
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे 2023-24 चा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीआधी सादर केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.. सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे शिक्षण खात्याचं बजेट आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता पालिका मुख्यालयात आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद होईल.
Continues below advertisement