BMC Budget 2023 : रस्त्यांवर रोज प्रवास करणाऱ्या रिक्षा चालकांना अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा?

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणारेय... मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील,  मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल हे बजेट सादर करणार आहेत. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रण, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, प्रशासनातील पारदर्शकता आणि सुशोभीकरणाचा समावेश करावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महापालिकेकडून अर्थसंकल्प सादर करताना नागरिक, राजकीय पक्षांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि सूचना लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर रोज प्रवास करणाऱ्या रिक्षा चालकांना अर्थसंकल्पाकडून काय अपक्षे आहेत..  हे रिक्षा चालक सर्वसामान्य मुंबईकर म्हणून या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे कसे बघतात ? जाणून घेऊयात.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola