BMC Budget 2023 : रस्ते, पाणी, दवाखाने? बजेटमधून तळागाळातील मुंबईकरांना काय हवं?

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणारेय... मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील,  मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल हे बजेट सादर करणार आहेत. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रण, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, प्रशासनातील पारदर्शकता आणि सुशोभीकरणाचा समावेश करावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महापालिकेकडून अर्थसंकल्प सादर करताना नागरिक, राजकीय पक्षांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि सूचना लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे... सर्वसामान्य मुंबईकरांना या बजेट मधून काय अपेक्षा आहेत?.. तळागाळातील मुंबईकरांना अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींवर खर्च व्हावा असं वाटतंय.. हे जाणून घेऊयात.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram