BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार, निवडणुकीआधी मुंबईकरांना काय मिळणार?
अभिषेक मुठाळ
Updated at:
03 Feb 2022 09:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेचं बजेट आज ऑनलाईन सादर होणार आहे. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला काय गिफ्ट मिळणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन कोणतीही नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल असणार आहे. तसंच मुंबईकर मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचीही घोषणा होणार असल्याचं समजतं. खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई यासाठी यंदाच्या अर्थसंकल्प तरतूद केली जाणार असल्याचं कळतं.