BMC : मुंबई मनपातील अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची मनाई करण्याचा आयुक्तांचा आदेश मागे
मुंबई महापालिकेतील सर्व खातेप्रमुख आणि अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची मनाई करणारे परिपत्रक अवघ्या २४ तासांतच मागे घेण्याची नामुष्की महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर ओढवली आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांकडे या पत्रकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनाही प्रसारमाध्यमांशी बोलण्यास परवानगी दिली आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आधीच्या परिपत्रकात केवळ आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनाच प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली होती.