BKC Vaccination Centre | लसीअभावी मुंबईतील सर्वात मोठं बीकेसी लसीकरण केंद्र बंद होण्याची शक्यता
Continues below advertisement
मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये कोरोना लसीचे केवळ 160 डोस शिल्लक आहेत. परिणामी लसीकरण केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. बीकेसी केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली असून बाहेर येऊन त्यांना समजावण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. परिणामी लोक वैतागून परत जात आहेत.
Continues below advertisement