BKC Road : बुलेट ट्रेनच्या कामासाठी बीकेसीमधील दोन रस्ते आजपासून 30 जून 2024 पर्यंत बंद
बुलेट ट्रेनच्या कामासाठी बीकेसीमधील दोन रस्ते आजपासून ३० जून २०२४ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. डायमंड बोर्स जंक्शन ते JSW सेंटर आणि प्लॅटिन बिल्डिंग जंक्शन ते मोतीलाल नेहरूनगर हे दोन रस्ते बंद करण्यात आल्याने बीकेसीमधील वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जमिनीखाली स्टेशन बांधण्यासाठी हे दोन मार्ग आजपासून बंद करण्यात आलेत. या निमित्ताने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आता वेग आल्याचं स्पष्ट झालंय.
Tags :
Bullet Train Roads Closures Decisions BKC Traffic Changes Diamond Bourse Junction JSW Centre Platinum Building Junction Motilal Nehrunagar