BKC COVID Center : रुग्णसेवेतील दोन रोबोट भंगारात, मनसेचा आरोप; माझाचा रिअॅलिटी चेक
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचे एक शिष्टमंडळ बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घ्यायला आले आहे. बीकेसी कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर मनसेने ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवले होते. ते न आल्याने आज मनसेचे पदाधिकारी बीकेसी कोविड सेंटरवर धडकलेत.